Breaking News

‘सीकेटी’त आयकर रिटर्न ई-फायलिंग आणि कर व्यवस्थापनविषयक व्याख्यान

पनवेल : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज न्यू पनवेल (स्वायत्त) येथे आयकर रिटर्न ई-फायलिंग आणि कर व्यवस्थापन याविषयावर अतिथी व्याख्यान बुधवारी (दि. 14) आयोजित केले होते. या व्याख्यानासाठी प्रमुख पाहुणे सनदी लेखापाल कौस्तुभ मधुसूदन जोशी आणि पीएनबी मेटलाईफचे शाखा व्यवस्थापक जयंत गायकवाड उपस्थित होते. या व्याखानासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एस. के.पाटील, वाणिज्य शाखेचे प्रमुख डॉ. एस. बी. यादव, आय. क्यू. ए. सी. समन्वयक  डॉ. बी. डी. आघाव यांनी उपस्थिती दर्शविली, तसेच विभागाचे सर्व शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.प्रस्तावना लेखा आणि वित्त विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. निलेश कोळी यांनी केली. कौस्तुभ मधुसूदन जोशी यांनी आय.टी.आर भरणे आणि कर व्यवस्थापन, कपात आणि सूट याबद्दल माहिती दिली. जयंत गायकवाड यांनी ई-हाऊस प्लॅनमध्ये गुंतवणूक कशी करावी, गुंतवणुकीचे महत्त्व, करमुक्त गुंतवणूक याबाबतीत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेखा आणि वित्त विभागाच्या प्रा. मोनिका भालेराव तसेच प्रा. अनिकेत सोनसुरकर यांनी या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी केल्या बद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर व संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे यांनी आयोजकांचे कौतुक केले.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply