पनवेल : रामप्रहर वृत्त
लागू बंधूतर्फे तज्ज्ञ मंडळींच्या कलानजरेतून साकारलेल्या मोती, हिरे आणि रत्नजडित दागिन्यांचे प्रदर्शन आणि विक्री सोहळा लागू बंधूंनी 17 व 18 सप्टेंबरदरम्यान सकाळी 11 ते सायंकाळी 8.30 वाजेपर्यंत सुरुची हॉटेल, ओल्ड पनवेल येथे आयोजित केला आहे. प्रसिद्ध लागू बंधू मोतीवाले म्हणजे उत्तम आणि सुंदर दागिन्यांची शाश्वती. गेल्या आठ दशकांपासून लागू बंधूंनी लोकांच्या मनात मानाचे आणि विश्वासाचे स्थान मिळवले आहे. लागू बंधूंची खासियत म्हणजे त्यांचे स्वतःचे असे डिझाईनिंग आणि मॅन्यूफॅक्चरिंग. याच कारणामुळे पारंपरिक डिझाईन्समध्येही कधीही न पाहिलेला एक वेगळा सुंदर पैलू त्यांना जगासमोर मांडता येतो. त्याचमुळे त्यांनी आजपर्यंत असंख्य नाविन्यपूर्ण आणि मोहक दागिने ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. लागू बंधूंचा हरेक दागिना म्हणजे एक्सक्लुझिव्ह बुटीक पीस. त्याचे गुपित म्हणजे त्यांचे सर्व संचालक हे कुशल जेमॉलॉजिस्ट आहेत. पनवेल येथे आयोजित प्रदर्शन आणि विक्री सोहळ्याला सहपरिवार भेट देऊन कलात्मक आणि नावीन्यपूर्ण असे अनमोल दागिने न्याहाळू शकता आणि ते खरेदीही करू शकता, प्रदर्शन आणि विक्री सोहळ्याला आवर्जून भेट द्या, असे आवाहन लागू बंधूतर्फे करण्यात आले आहे.