Breaking News

नवीन पनवेलमध्ये रक्तदान शिबिर

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

पनवेल ः रामप्रहर वृत्त

भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. त्याचप्रमाणे विविध मान्यवरांनी त्यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उत्कर्ष सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळ व रुधिर सेतू चरित्रबल ट्रस्ट पनवेल यांच्या सहकार्याने शुक्रवारी (दि. 5) नवीन पनवेल सेक्टर 14 येथील येथे चांगू काना ठाकूर विद्यालय टाटा मेमोरियल हॉस्पिटल खारघर या ब्लड बँकसोबत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.

या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, जयंत पगडे, सुभाष भुजबळ, सुशीला घरत, तेजस  कांडपीले, विद्याताई गायकवाड, जगदीश घरत, विजय म्हात्रे, राकेश भुजबळ, क्रांतीकुमार नारायण चितले, प्रशांत फुलपगार, हेमंत भुजबळ, प्रशांत भुजबळ, अजित लोंढे, किशोर शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली, तसेच रुधीर सेतू चॅरिटेबल ट्रस्ट यांसकडून अरुण गदरे, मुरलीधर डाके, नरेंद्र कुमार दसरे, सुरेश रेसबुड, उज्वला भिसे, प्रतिभा खन्ना आणि भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते आणि सदस्य उपस्थित होते.

रक्तदान शिबिरासाठी 101 रक्तदात्यांनी सहभाग घेतला तसेच महिलांचाही चांगला प्रतिसाद मिळाला.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply