पनवेल : रामप्रहर वृत्त
नवीन पनवेल येथील डी-मार्ट समोरील मैदानात युथ सोशल फाउंडेशनच्या वतीने गौरा गणपती उत्सव आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवाचे औचित्य साधून हळदी कुंकू समारंभाचे आयोजन बुधवारी (दि. 14) करण्यात आले होते. हा समारंभ युथ सोशल फाउंडेशन नवीन पनवेल यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तसेच या कार्यक्रमावेळी शिवाजीनगर गावातील सुकन्या श्वेता सुरेश ठाकूर हिची कलर्स मराठी वाहिनीवरील सूर नवा ध्यास नवा या स्पर्धेत निवड झाल्याबद्दल तिला फाऊंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी नगरसेवक संतोष शेट्टी, माजी नगरसेविका राजेश्री वावेकर, प्रभाग समितीचे माजी सभापती समिर ठाकूर, युवा नेते किशोर चौतमोल, युथ सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष मयुर आंग्रे, संजना आंग्रे, कुलबिर सिंग चौंडोक, हेमंत ठाकुर, रिमा रावल, संजु पिल्ले, बिट्टु शिरसाट, योगेश पवार, रगु गनगा, मयूर पर्हाड, मनिष चव्हाण, सागर फोकणे, सुनी आण्णा, अभिषेक वर्मा आदी उपस्थित होते.