Breaking News

आग विझवताना इमारत कोसळली

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

राजधानी दिल्लीतील आगीच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. गुरुवारी (दि. 2) दिल्ली आणखी एका आगीच्या घटनेने हादरली. पिरागढ भागातील एका कारखान्यात आगीचा भडका उडाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असताना स्फोट होऊन कारखान्याची इमारत कोसळली. यात अग्निशमन दलाच्या जवानांसह अनेक जण ढिगार्‍याखाली अडकले आहेत.

पिरागढमधील उद्योगनगर भागात असलेल्या एका कारखान्याच्या इमारतीला पहाटे आग लागली. या आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आल्यानंतर जवानांनी तातडीने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले, मात्र आग विझवताना अचानक इमारतीत स्फोट झाला. या हादर्‍याने इमारत कोसळली. इमारतीच्या ढिगार्‍याखाली अग्निशमनदलाच्या जवानांसह अनेक जण गाडले गेले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव मोहीम सुरू आहे, अशी माहिती दिल्ली अग्निशमन दलाचे संचालक अतुल गर्ग यांनी दिली.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply