सेवा पंधरवडा आयोजनासंदर्भात आढावा बैठक
पनवेल ः रामप्रहर वृत्त
आजपर्यंत आपण सर्व झोकून देऊन काम करीत राहिलो आहे. त्याच प्रमाणे येणार्या कालावधीतदेखील अशाच प्रकारे कार्यरत राहिल्यास आपण अधिक चांगल्या पद्धतीने लोकांची कामे करू शकतो, असे प्रतिपादन भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 16) केले. ते सेवा पंधरवड्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. देशाचे यशस्वी व लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती या काळात म्हणजेच 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध सेवाकार्य असलेल्या सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत विविध उपक्रमांच्या आयोजनासंदर्भात महिला भाजप मोर्चाच्या पदाधिकार्यांची बैठक पनवेल येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झाली. या बैठकीस भाजप महिला मोर्चाच्या कोकण अध्यक्ष निलम गोंधळी, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष हेमा मानकर, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष स्मिता गायकर, पनवेल तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, रायगड संपर्क प्रमुख चारुशीला घरत, पनवेल महापालिकेच्या माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी नगरसेविका दर्शना भोईर, वृषाली वाघमारे, राजश्री वावेकर, रूचिता लोंढे, जिल्हा उपाध्यक्ष संध्या शारबिद्रे, प्रतिभा भोईर, बिना गोगरी, वनिता पाटील, मनिषा निकम, प्रिया मुकादम, गीता चौधरी, भाजप जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, भटक्या विमुक्त महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष विद्या तामखेडे, चिंध्रण ग्रामपंचायतीच्या सरपंच कमला देशेकर यांच्यासह महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या. अॅड. माधवी नाईक आणि विक्रांत पाटील यांची भाजप प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव या बैठकीत पारित करण्यात आला.