Breaking News

खोपोलीत भाजपचे किर्ती ओसवाल यांच्याकडून पाणपोईची व्यवस्था

खालापूर : प्रतिनिधी

भाजप व्यापारी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष तथा  यशस्वी उद्योजक किर्ती चंपालाल ओसवाल यांच्या संकल्पनेतून खोपोली शहरातील मुख्य बाजारपेठेत उभारण्यात आलेल्या पाणपोईचे लोकार्पण सोमवारी (दि. 15) भाजप महिला मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्षा अश्विनीताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

खोपोली शहरातील मुख्य बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात लोकांची वर्दळ असते. या ठिकाणी दर गुरुवारी आठवडा बाजार भरतो. येथे येणार्‍या सर्वांनाच बाटली बंद पाणी विकत घेवून पिणे शक्य होत नाही. पाण्यापासून कोणी वंचित राहू नये, या हेतूने भाजपचे युवा नेते किर्ती ओसवाल यांनी तेथे पाणपोईची व्यवस्था केली आहे. या पाणपोईचे लोकार्पण सोमवारी अश्विनीताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी भाजप नेते विजय तेंडुलकर, खोपोली शहर सरचिटणीस हेमंत नांदे, सुमिता महर्षी, जैन समाज ट्रस्टचे अध्यक्ष हस्तीमल ओसवाल, खोपोली शहर व्यापारी संघटना अध्यक्ष कांतीशेठ ओसवाल,सांस्कृतीक सेल अध्यक्ष निशा दळवी यांच्यासह  भाजप पदाधिकारी, शहरातील व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply