भारत विकास परिषद आणि भाजप युवा मोर्चाचे व्यावसायिकांना आवाहन
पनवेल : रामप्रहर वृत्त
भारत विकास परिषदेच्या पनवेल शाखा आणि भाजप युवा मोर्चा पनवेल यांच्या वतीने चिनी अॅप व वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्या अंतर्गत भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. 2) नवीन पनवेल येथे या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.
नवीन पनवेल येथील एचडीएफसी सर्कल येथे झालेल्या कार्यक्रमास युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अजित सिंग, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्यासह भारत विकास परिषद पनवेल शाखेचे सदस्य आणि भाजप युवा मोर्चा पनवेल शहर मंडलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वे ळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी परिसरातील नागरिक व व्यावसायिकांना चिनी वस्तूंचा बहिष्कार करून आत्मनिर्भर भारत संकल्पनेस सहकार्य करण्याचे आवाहन केले.