Breaking News

पनवेल रेल्वे स्टेशनबाहेरील महिला हत्येचे गुढ उकलले

पती व त्याच्या प्रेयसीनेच दिली सुपारी; मारेकर्‍यांचा शोध सुरू

पनवेल : वार्ताहर

पनवेल रेल्वे स्थानकाबाहेर गत गुरुवारी रात्री गळ्यावर वार करून हत्या करण्यात आलेल्या प्रियंका रावत या 29 वर्षीय महिलेच्या प्रकरणाचा छडा लावण्यात खान्देश्वर पोलिसांना यश आले आहे, ही हत्या प्रियंकाचा पती व त्याच्या प्रेयसीने सुपारी देऊन घडवून आणल्याचे तासात उघडकीस आले आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रियंकाच्या पतीसह त्याच्या प्रेयसीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आता या हत्या प्रकरणातील मारेकरी व त्याच्या साथीदाराचा शोध सुरू केला आहे.

देखतसिंग असे प्रियंका यांच्या संशयीत आरोपी पतीचे नाव आहे. देखतसिंग याचे अनैतिक संबंध असल्याची माहिती प्रियंका यांना नुकतीच कळाली होती. प्रियंका आणि देखतसिंग हे परिवारासह विहीघर गावातील महालक्ष्मी सोसायटीत राहत होते. प्रियांका या ठाणे येथील डीजीटल मार्केटींग कंपनीमध्ये काम करुन संसाराला मदत करत होत्या. पनवेल तालुक्यातील विहीघर येथे राहणारी प्रियंका रावत ही ठाणे येथून लोकलने पनवेल रेल्वेस्थानकात उतरल्यानंतर रेल्वे स्थानकाच्या बाहेर दबा धरून बसलेल्या मारेकर्‍याने गर्दीमध्ये प्रियंकाच्या गळ्यावर वार करून तिची हत्या करून पलायन केले होते. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती.

दरम्यान, पोलिसांनी देवव्रतसिंग व त्याच्या प्रेयसीला ताब्यात घेतले आहे. या दोघांनी ज्या मारेकर्‍यांच्या माध्यमातून ही हत्या घडवून आणली. त्या दोन मारेकर्‍यांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply