Breaking News

इराणची पाकमध्ये घुसून कारवाई करण्याची धमकी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

भारताने पाकिस्तानात घुसून दहशतवादी तळावर एअर स्ट्राइक केल्यानंतर आता इराणने पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्याची धमकी दिली आहे. भारताप्रमाणे इराणही पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांच्या कारवायांनी त्रस्त आहे. पाकिस्तानातून इराणविरोधी दहशतवादी कारवाया चालतात. पाकिस्तान या दहशतवादी गटांना रोखण्यासाठी कोणतीही पावले उचलत नसल्यामुळे इराणच्या सरकारने आणि सशस्त्र दलांनी पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

इराणमधल्या शक्तीशाली आयआरजीसी फोर्सचे कमांडर जनरल कासीम सोलेमनी यांनी पाकिस्तान सरकार आणि लष्कराला धमकी दिली आहे. पाकिस्तान कुठल्या दिशेने चालला आहे ?. तुम्ही तुमच्या शेजारी देशांच्या सीमावर्ती भागात अशांतता निर्माण करण्यासाठी कारणीभूत आहात. इराणच्या संकल्पाची परिक्षा पाहू नका, अशा शब्दात कासीम सोलेमनी यांनी इशारा दिला आहे. मागच्या काही वर्षात भारत व इराण दहशतवादविरोधी सहकार्य वाढवले आहे. परराष्ट्र स्तरावरील चर्चेमध्ये पुढच्यावेळी हा महत्वाचा मुद्दा असेल. परराष्ट्र सचिव विजय गोखले इराणला जाणार होते. पण भारत-पाकिस्तान तणावामुळे त्यांचा इराण दौरा पुढे ढकलण्यात आला. पाकिस्तानला लागून असणार्‍या सीमेवर इराणला भिंत बांधायची आहे. पाकिस्तानला त्यांच्या भूमीतून चालणार्‍या इराणविरोधी कारवाया रोखता येत नसतील तर आम्ही पाकिस्तानात घुसून कारवाई करु, असे इराणच्या संसदेतील परराष्ट्र धोरण आयोगाचे अध्यक्ष हेशमातोल्लाह यांनी सांगितले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply