Breaking News

पनवेल ज्येष्ठ नागरिक संघात डॉक्टरांतर्फे गाण्यांचा कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेलच्या ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सुरबहार हा गाण्यांचा कार्यक्रम शनिवारी (दि.24) संघाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम करणारे सर्वजण हे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर होते हे या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य होते. संगीताच्या माध्यमातून 72 रोगांवर उपचार होतात, असे प्रतिपादन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. शशिकांत कामत यांचे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जयवंत गुर्जर यांनी स्वागत केले. डॉ. पूजा बांदेकर यांचे स्वागत उपाध्यक्षा माधवी गोसावी यांनी केले. डॉ. नम्रता जोशी, डॉ. सुदेशा रे, डॉ. विपुल सकपाळ यांचे स्वागत सचिव सुनील खेडेकर यांनी केले. तर निवेदिका डॉ. विदुला कामत यांचे स्वागत संघाचे माजी अध्यक्ष नंदकुमार जोशी यांनी केले. डॉ. शशिकांत कामत, डॉ. पूजा बांदेकर, डॉ. सुदेशा रे, डॉ. विपूल सकपाळ, डॉ. अमृता जोशी आदींनी गाणी गायली. डॉ. नम्रता जोशी यांनी इतर गाण्या बरोबर लावणी ही सादर केली. या कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यकारिणी सदस्य, बहुसंख्य सभासद, पत्रकार लेखक दिलीप रेडकर उपस्थित होते.

Check Also

खासदार बारणेंच्या विजयासाठी पनवेलमध्ये जोरदार प्रचार

आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ …

Leave a Reply