Breaking News

काळीज खरवली ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप रिंगणात

महाड ः प्रतिनिधी

महाड तालुक्यातील महत्वाच्या आणि आमदार भरतशेठ गोगावले यांच्या गृहातील काळीज-खरवली या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सरपंचपदाचे सात तर सदस्यांचे 44 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या निवडणुकीत भाजपदेखील रिंगणात उतरला असून सरपंचपदासह सदस्यपदाचे अर्ज दाखल केले आहेत. महाड तालुक्यातील महत्त्वाच्या आणि श्रीमंत समजल्या जाणार्‍या काळीज- खरवली ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंचपदासाठी सात जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले, सदस्यपदासाठी 44 अर्ज दाखल झाले आहेत. 13 सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीच्या सरपंचाची थेट जनतेतून निवडणूक होणार आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाच्या विधानसभेचे प्रतोद आ. भरत गोगावले यांची होमग्राऊंड समजली जाणार्‍या या ग्रामपंचायत निवडणूकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या निवडणुकीत भाजपनेदेखील एन्ट्री केली असून सरपंचपदी दोन आणि सदस्यपदी सहा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. या वेळी भाजप तालुकाध्यक्ष जयवंत दळवी, उपतालुकाध्यक्ष प्रभाकर झांजे, योगेश झांजे, उमेदवार संतोष सोनवणे, रविंद्र सागवेकर, तुषार महाजन आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते. अर्जांची छाननी बुधवारी (दि. 28) होणार असून, 30 सप्टेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. याच दिवशी उमेदवारांना चिन्हांचे वाटप होणार आहे, तर 16 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून दुसर्‍या दिवशी निकाल लागणार आहे.

Check Also

नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …

Leave a Reply