उरण : प्रतिनिधी, बातमीदार
जेएनपीए बंदरातून दुबईतील जेबेल अली बंदरात निर्यात करण्यात आलेल्या संशयित कंटेनरमधून अडीच कोटींचे तीन मेट्रीक टन रक्तचंदन जप्त करण्यात आले आहे. जेएनपीए सीमा शुल्क विभागाने ही कारवाई केली.
जेएनपीए बंदरातून दुबईत निर्यात करण्यात येत असलेल्या मालाच्या कंटेनरबाबत सीमा शुल्क विभागाला संशय होता. त्यामुळे या विभागाच्या गुन्हे पथकाने हा कंटेनर दुबईतून परत मागविला. या कंटेनरची तपासणी करण्यात आली असता यामध्ये सुमारे तीन मेट्रिक टन रक्तचंदन आढळले आहे.
दोन आठवड्यांपूर्वी उरण परिसरातील गोदामातून अशाच प्रकारे सुमारे तीन मेट्रिक टन रक्तचंदन जप्त करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास करीत असताना समोर आलेल्या माहितीवरून सीमा शुल्क विभागाने हा निर्यात झालेला संशयित कंटेनर परत मागविला. या कंटेनरमध्ये तस्करी करण्यात येत असलेले रक्तचंदन सीमाशुल्क विभागाच्या केंद्रीय गुन्हे पथकाकडून जप्त करण्यात आले आहे.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …