रोहे प्रतिनिधी
महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून धाटाव येथील एम. बी. मोरे महिला महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागातर्फे रविवार (दि. 2) तालुक्यातील रोठ बुद्रुक गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या वेळी गावातील मुख्य रस्त्यांवरील कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. धाटाव येथील एम. बी. मोरे महिला महाविद्यालयातील एनएसएस विभागातर्फे रविवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली. या वेळी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.त्यानंतर एनएसएस विभागातील विद्यार्थिनी आणि प्राध्यापकांनी रोठ बुद्रुक गावातील मुख्य रस्त्यांची साफसफाई केली. आणि ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. नवरात्र उत्सवानिमित्त विद्यार्थिनीनी गावदेवी मंदिराला भेटही दिली.तसेच रोठ बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांसह पर्यावरण संवर्धन शपथ घेतली. रोठ बुद्रुकचे सरपंच नितीन वारंगे, उपसरपंच अलका बामुगुडे व कर्मचारी तसेच मोरे महिला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रसन्न म्हसळकर, राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. ममता बींद, प्रा. प्रतिमा भोईर, प्रा. दिपाली वारांगे, एनएसएसच्या 30 स्वयंसेविका यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.