चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवासी सुखरूप
पनवेल : वार्ताहर
सायन-पनवेल महामार्गावर खारघर येथील कोपरा पुलाजवळ टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या खासगी बसला मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. चालकाने प्रसंगावधान दाखवत बस थांबवून प्रवाशांना वाहनाबाहेर काढल्याने मोठी जीवितहानी टळली. अग्निशमन विभागाने बसला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.
ही बस मुंबईवरून सातार्यातील सांगोलाकडे जात होती. बसमध्ये एकूण 17 प्रवासी होते. बस, सायन पनवेल महामार्ग, कोपरा पुलावरून जात असताना अचानक इंजिनमधून ठिणग्या उडू लागल्या. बसचालकाने प्रसंगावधान राखून बस थांबवली, प्रवाशांना आपत्कालीन दरवाजामधून बाहेर काढले. इतक्यात बसने पेट घेतला, मात्र तोपर्यंत प्रवासी बसमधून उतल्याने कुठलीही जिवीतहानी झाली नाही. या आगीत बस पुर्णपणे जळून खाक झाली आहे.