Breaking News

तांबडी अत्याचार व हत्या प्रकरण; आरोपींना कडक शिक्षा करा

पीडित कुटुंबीय आणि मराठा समाजाची गृहमंत्र्यांकडे मागणी

रोहे : प्रतिनिधी
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रोहा तालुक्यातील तांबडी येथील अत्याचाराला बळी पडलेल्या मयत मुलीच्या कुटुंबीयांची सोमवारी (दि. 24) भेट घेतली. या वेळी पीडित कुटुंबीय आणि मराठा समाजाच्या वतीने आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करावी, अशी मागणी गृहमंत्र्यांकडे करण्यात आली.
या सांत्वनपर भेटीवेळी गृहमंत्री देशमुख यांच्यासोबत पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे आदी सोबत होते. तांबडी बुद्रुक येथे घडलेली घटना ही दुर्दैवी असून, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला पाहिजे आणि यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी अनेक संघटनांची, लोकांची होती. यानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पोलीस खात्याकडून लवकरात लवकर चार्जशीट दाखल करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री देशमुख यांनी या वेळी सांगितले. गृहमंत्र्यांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर रोहा शहरातील नगर परिषदेच्या ज्येष्ठ नागरिक सभागृहात पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply