पनवेल : रामप्रहर वृत्त
जाणीव एक सामाजिक संस्था पनवेलचे संस्थापक अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक नितीन पाटील यांच्या माध्यमातून प्रभाग क्र.18 अंतर्गत दिवाळीनिमित्त ’भव्य किल्ले’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे माजी नगरसेवक नितीन पाटील यांच्या संकल्पनेतून यावर्षी एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे. सर्व तरुणांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जवळुन अनुभवता यावा यासाठी किल्ले स्पर्धेत सहभागी प्रत्येक मावळ्यास मोफत ’रायगड दर्शन’ घडवण्यात येणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत मोठ्या संख्येने तरुणांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. जाणीव एक सामाजिक संस्था आयोजित प्रभाग क्र.18 अंतर्गत भव्य किल्ले स्पर्धेत विजेत्या प्रथम तीन क्रमांकांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत तर प्रत्येक सहभागी मावळ्यास सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. सहभाग नोंदवण्यासाठी 24 ऑक्टोबर पर्यंत मुदत ठेवण्यात आली असून 25 ते 28 ऑक्टोबर पर्यंत तज्ञ परीक्षकांच्या माध्यमातून किल्ले परीक्षण केले जाणार आहे. अधिक माहितीसाठी प्रसाद कंधारे (8451842919) व महेश सरदेसाई (9323266163) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.