Breaking News

रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाची शैक्षणिक सहल

खारघर : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाची बुधवारी (दि. 19) नॅशनल स्टॉक एक्सचेंज येथे शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली होती. बारावी वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी या शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. नॅशनल स्टॉक एक्सचेंज ज्याला आपण मराठीत ‘राष्ट्रीय रोखे बाजार’ (एनएसई) असे म्हणतो. एनएसई हे भारत देशातील मुंबई शहरात आहे. 1992साली स्थापन झालेल्या एनएसईवर सध्या 1696 कंपन्या रोखे व समभागाची खरेदी विक्री करतात. एनएसईमध्ये वापरल्या जाणार्‍या निदैशांकाचे सीएनएक्स निफ्टी असे नाव आहे. निफ्टी हा मुंबई रोखे बाजाराच्या सेन्सेक्ससोबत भारतामधील सर्वात महत्त्वाचा निदैशांक समजला जातो. भारतीय अर्थव्यवस्थेची नाडी मानला जातो. एकूण 63 विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक सहलीचा लाभ घेतला. यात मुलांना इकोनॉमिक ट्रिक्स सांगितले. त्याचबरोबर कॅपिटल माकैट, ट्रेडिंग, गुंतवणुक कसे करायला पाहिजे याबद्दल मुलांना माहिती मिळाली. या शैक्षणिक सहलीचे नियोजन डॉ. सुहास स, सौ. स्वप्ना यांनी केले. या शैक्षणिक सहलीसाठी प्राचार्या निशा नायर यांचे मार्गदर्शन भेटले.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply