माजी सरपंच, उपसरपंच, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांनी केले स्वागत
पनवेल ः रामप्रहर वृत्त
शेतकरी कामगार पक्षाला करंजाडेमध्ये मोठा धक्का बसला आहे. शेकापचे माजी सरपंच बळीराम म्हात्रे आणि माजी उपसरपंच आशा म्हात्रे यांनी समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा सोमवारी (दि. 24) झाला. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, करंजाडेमधील पाण्याच्या पाइपलाइनचे जे काम 2023 साली पूर्ण होणे अपेक्षित होते ते काम घडकोंबड्या सरकारमुळे रखडले होते, मात्र आता हे काम वेळेत करून करंजाडेमधील नागरिकांची पाण्याची समस्या मार्गी लावण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत. या कार्यक्रमाला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, विभागीय अध्यक्ष कर्णा शेलार, रायगड जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे, शहर अध्यक्ष मिरेंद्र शहारे, नाथाभाई भारवाड, सागर आंग्रे, मंगेश शेलार, विजय आंग्रे, गणेश मोरे, नंदू भोईर यांच्यासह श्री. सामाजिक संस्थेचे सर्व सदस्य, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी शेकापचे माजी सरपंच बळीराम म्हात्रे, माजी उपसरपंच आशा म्हात्रे, सुनीलशेठ भोईर, प्रभुद्ध सामाजिक संस्थेचे विक्रम मोरे, अविनाश कदम, गणेश गायकर, विशाल म्हात्रे, छोटूराम पारधी, उषाबाई पारधी, गायत्री पारधी, रवींद्र पारधी, नितीन पारधी, अभिजीत थोरात, किशोर यादव, अमोल माने, सुजीत जाधव, सदानंद सराफ, रूपेश पेडामकर, राजीव पवार, संदीप मोरे, यशवंत खेडकर, विजय गुरव, गणेश वालझडे, भीमराव चव्हाण, अशोक जाधव, ओमकार सकाटे, प्रथमेश पवार, ओमकार चंदने, प्रसाद खोपडे, हर्षद सहानी, ओमकार साळवी, मंगेश माळी, आकाश पवार, संकेत घाटे, राजेश इलीगेटी, वेदांत शिंदे, अश्विनी क्षीरसागर, प्रवीण सावंत, सक्षम मोरे, स्वप्नील मोरे, राकेश धुमाळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे स्वागत करण्यात आले. दरम्यान, बळीराम नारायण म्हात्रे यांची भाजपचे तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.