Breaking News

मनीष ठाकूर समर्थकांसह बाळासाहेबांच्या शिवसेनेत दाखल

पनवेल ः वार्ताहर

उद्योजक मनीष ठाकूर यांच्यासह त्यांच्या शेकडो समर्थकांनी हातात भगवा झेंडा घेत सोमवारी (दि. 7) बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला.खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचे स्वागत केले. संपर्कप्रमुख रामदास शेवाळे आणि उपमहा नगरप्रमुख चंद्रकांत राऊत यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश झाला. पनवेलमध्ये संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी पावले उचलण्यात आले आहे. त्या अनुषंगाने उद्योजक मनीष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी शेकडो उत्तर भारतीयांनी भगवा हातामध्ये घेतला. खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व समाजातील घटकांना बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये सामावून घेतले जात आहेत. बाहेरील राज्यातून या भागात नोकरी व्यवसाय निमित्त स्थायिक झालेलेसुद्धा आपलेच बांधव आहेत. त्यांचे प्रश्न आणि समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून बाळासाहेबांची शिवसेना कटिबद्ध असल्याचे बारणे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे पनवेल परिसरामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लवकरच मेळावा घेण्यात येणार आहे. या माध्यमातून आपली राजकीय ताकत दाखवून देऊ असेही त्यांनी सांगितले. उत्तर भारतीय मोठ्या संख्येने पनवेल परिसरात स्थायिक झाले आहेत. त्यांचे प्रश्न समस्यांची सोडवणूक करण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखे नेतृत्व खरोखर आशादायी आहे. या भागामध्ये रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगले संघटन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मी बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असे मनीष ठाकूर यांनी सांगितले. या वेळी पदाधिकार्‍यांची विविध पदी नियुक्ती करण्यात आली. संपर्कप्रमुख रामदास शेवाळे, महानगर संघटक मंगेश रानवडे, महानगर संघटिका ऍड सुलक्षणा जगदाळे, उप महानगरप्रमुख चंद्रकांत राऊत, अर्जुन डांगे, कळंबोली शहर प्रमुख तुकाराम सरक, रामदास शेवाळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत फाळके, दत्ता शिंदे, आबा लकडे, महेश गोडसे, शरद कदम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply