Breaking News

पनवेलच्या रामेश्वर महादेव मंदिरात दीपोत्सव

त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त परिसर दिव्यांनी लखलखला

पनवेल : रामप्रहर वृत्त

त्रिपुरी पौर्णिमेचे औचित्य साधून पनवेल नगरीतील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या रामेश्वर महादेव मंदिरात सोमवारी (दि. 7)दीपोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी संपूर्ण परिसर दीपोत्सवाने उजळून निघाला. कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा असेही म्हटले जाते, या दिवशी शिवमंदिरात त्रिपुरी वात अर्थात दिव्यांची वात लावली जाते,  हा तुळशी विवाहाचा शेवटचा दिवस मानला जातो, हिंदु धर्मात अनन्य साधारण महत्त्व असलेली कार्तिक पौर्णिमा आहे या दिवशी गंगेत स्नान करण्याने मोठे पुण्य मिळते अशी भावना आहे. आजच्या दिवशी अनेक ठिकाणी दिपोत्सवही साजरा केला जातो. या दिवशी भगवान शंकराने अखंड भूमीवरून जनतेला त्रास देणाऱ्या त्रिपुर राक्षसाचे तीन पुत्रांचा वध केला म्हणून या पौर्णिमेला त्रिपुरी किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात, त्याचेच औचित्य साधून  रामेश्वर महादेव मंदिरात भगवान शंकरापुढे आरती व त्रिपुर वात लावून उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन जाणीव एक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष माजी नगरसेवक नितीन पाटील व उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणी सदस्य तथा मंदिराचे अध्यक्ष उमेश इनामदार आणि यांनी केले होते. या दीपोत्सवाला माजी सभागृह नेते परेश ठाकूर, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, शहर अध्यक्ष जयंत पगडे, जाणीव एक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक नितीन पाटील, माजी नगरसेविका निता माळी, प्रादेशिक परिवहन अधिकारी धोटे, दिनेश बागुल, श्री रामेश्वर महादेव देवस्थानचे अध्यक्ष उमेश इनामदार, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, सोशल मीडिया सेलचे शहर संयोजक प्रसाद हनुमंते, महिला मोर्चाच्या लीना पाटील तसेच मंदिराचे विश्वस्त, कार्यकर्ते व भाविकगण उपस्थित होते.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply