Breaking News

पनवेल महापालिकेत भाजप नगरसेविकेची बिनविरोध निवड

महिला व बालकल्याण सभापतीपदी कुसुम म्हात्रे

पनवेल : प्रतिनिधी

भाजपच्या नगरसेविका कुसुम म्हात्रे यांची महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी सोमवारी (दि. 25) बिनविरोध निवड झाली. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवेन, तसेच महिला व बालकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी निवडीनंतर दिली.

पनवेल महापालिकेच्या रिक्त झालेल्या महिला व बालकल्याण सभापतीपदासाठी सोमवारी निवडणूक झाली. या वेळी कामोठे प्रभाग 12मधून निवडून आलेल्या भाजपच्या नगरसेविका कुसुम म्हात्रे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जाहीर केले. या वेळी महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, आयुक्त गणेश देशमुख, नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर कामोठे येथून आलेल्या म्हात्रे यांच्या समर्थकांनी महापालिकेसमोरील रस्त्यावर जल्लोष केला.

पनवेल महापालिका ही नवज्यात आहे. तिची घडी बसवताना कुसुमताई या महिला व बालकांचे प्रश्न सोडवतील, तसेच त्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी चांगले काम करतील असा आम्हाला विश्वास आहे. त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा!
-परेश ठाकूर, सभागृह नेते, पमपा

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply