Breaking News

महाड एमआयडीसीतील कंपनीमध्ये वायूगळती

एकाचा मृत्यू, एक अत्यवस्थ

महाड : प्रतिनिधी
महाड औद्योगिक क्षेत्रातील प्रसोल केमिकल या कारखान्यात सोमवारी  (दि. 14) रात्री 9च्या सुमावारास वायूगळती झाली. यात एक कामगार जागीच मृत्युमुखी पडला, तर अन्य एक कामगार अत्यवस्थ असल्याची माहिती पोलिसांनी दिली. जितेंद्र भागुराम आडे (वय 40) असे मयत कामगाराचे नाव आहे.
प्रसोल केमिकल कारखान्यात फिनिश गोडावूनजवळील अनलोडिंग विभागात जितेंद्र भागुराम आडे हा माथाडी कामगार कॉस्टिक लिक्विड खाली करण्याचे काम करीत होता. या वेळी त्यांच्यासमवेत मिलिंद मोरे हेही होते. तेथे सुमारे 9च्या सुमारास वायू गळती झाली आणि जितेंद्र आडे व मिलिंद मोरे यांना या विषारी वायूची बाधा झाली. या दोघांना महाडमधील देशमुख हॉस्पिटल येथे नेण्यात आले, पण यातील आडे यांना ग्रामीण रुग्णालयात स्थलांतर करण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
संतप्त ग्रामस्थांची दगडफेक
मयत कामगार जितेंद्र आडे हा वाळण गावातील असल्याने ग्रामस्थ संताप व्यक्त करीत कंपनीच्या गेटवर जमा झाले. या वेळी कंपनीच्या फलकाची मोडतोड करीत सुरक्षा गार्डच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे या ठिकाणी तणाव निर्माण झाला. प्रसोल कंपनीत यापूर्वीदेखील अपघाताच्या घटना घडल्या असून सर्वसामान्य कामगाराला जोपर्यंत नुकसानभरपाई मिळत नाही तोपर्यंत वाळण ग्रामस्थ गप्प बसणार नाहीत, अशी भूमिका या वेळी शशिकांत कालगुडे यांनी मांडली. महाड औद्योगिक पोलीस आणि शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम केले.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply