Breaking News

मोदी सरकारच्या सातवी वर्षपूर्ती

भाजपचे गावोगावी कोरोनासंबंधी सेवाकार्य

पेण : रामप्रहर वृत्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 30 मे रोजी सात वर्षे पूर्ण होत असून त्या दिवशी भाजप दक्षिण रायगड जिल्ह्यामधील 200 गावांमध्ये कोरोनासंबधी सेवाकार्य करणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी दिली. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे निर्माण झालेली स्थिती ध्यानात घेता कोणताही उत्सव होणार नाही, असेही ते म्हणाले.

मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल नुकतीच पक्षाची राज्यस्तरीय ऑनलाइन बैठक झाली. त्या बैठकीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्यानुसार यंदा मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त विशेष सेवाकार्य करण्यात येणार असल्याचे अ‍ॅड. महेश मोहिते यांनी सांगितले.

कोरोनाच्या संकटात भाजप तर्फे सातत्याने सेवाकार्य चालू आहे. 30 मेचा दिवसही विशेष सेवाकार्य करून साजरा करण्यात येणार आहे. त्या दिवशी दक्षिण रायगड जिल्ह्यातील सुमारे 250 गावांमध्ये भाजप कार्यकर्ते सेवाकार्य करणार आहेत. त्यामध्ये स्वच्छता मोहीम, लसीकरणासाठी मदत, कोरोना रुग्णांना जेवणाची व्यवस्था, मोफत रुग्णवाहिका यांचा समावेश असेल. जिल्ह्यातील भाजपचे आमदार, नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते या सेवाकार्यात सहभागी होणार आहेत. या वेळी गावातील आशा सेविका आणि कोरोना योद्ध्यांचा पक्षातर्फे सत्कार करण्यात येईल. कोरोनासंबंधी सर्व नियमांचे पालन करून आणि प्रशासनाला सहकार्य करून हा उपक्रम राबविला जाणार असल्याचे अ‍ॅड. मोहिते यांनी सांगितले.

भाजप युवा मोर्चा, महिला मोर्चा, किसान मोर्चा अशा सर्व मोर्चांचे कार्यकर्ते 30 मे रोजी रक्तदान शिबिरांचे आयोजन करणार असल्याची माहिती भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. मोहिते यांनी दिली.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply