रोहे ः प्रतिनिधी
नगर परिषद हद्दीतील रोहा तहसील कार्यालयाच्या रस्त्यावर ठिकठिकाणी कचरा पडला आहे. घंटागाडी दारोदारी येत असतानासुध्दा रस्त्याच्या बाजूला कचरा पसरला असल्याने नागरिकच स्वच्छता अभियानास हरताळ फासत असल्याचे चित्र दिसत आहे. रोहा शहरात जनजागृती रॅली काढून तसेच ठिकठिकाणी फलक लावून नागरिकांत स्वच्छतेबाबत जागृती करण्यात येत आहे. स्वच्छता अभियानही राबविण्यात येत आहे. मात्र नागरिकच स्वच्छता अभियानाला हरताळ फासत असल्याचे चित्र शहरातील काही भागात दिसत आहे. शहरातील फिरोज टॉकीज ते तहसील कार्यालय मार्गावर तसेच प्रांत, पोलीस ठाणे परिसरातही कचरा पडलेला दिसत आहे. केंद्र व राज्य सरकारकडून स्वच्छतेचे महत्त्व पटवले जात आहे. नगर परिषदेची घंटागाडी दारोदारी जात आहे. मात्र शहराच्या काही भागातील नागरिक रस्त्याच्या बाजूला कचरा फेकत आहेत.