नागोठणे : प्रतिनिधी
नागोठणे येथील एसएसओएसपी कॉलेज ऑफ डिप्लोमा इंजिनीरिंगच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सुुयश संपादन केले आहे.
नागोठणे कॉलेजच्या भाविक अनंत घाटवळ या विद्यार्थ्याने रसायनीतील पिल्लई इंजिनीअरिंग कॉलेज येथे झालेल्या झोनल अॅथलेटिक्समध्ये 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक जिंकले. त्याचप्रमाणे पुण्यातील लोणीकंद येथे रामचंद्र पॉलिटेक्निक या ठिकाणी झालेल्या मुलींच्या कबड्डी स्पर्धेत डिप्लोमा कॉलेजच्या मुलींच्या संघाने विजेतेपद पटकाविले.
कबड्डी संघाची कर्णधार हर्षाली म्हात्रे हिने मोलाची कामगिरी केली. सेजल पाटील, वैष्णवी अडूरकर, सानिका कदम, क्षितिज पाटील, तृप्ती घाग, धनश्री म्हात्रे यांनी तिला चांगली साथ दिली. राखीव गटात पूर्वा फाटक, ऐश्वर्या सातमकर, मोनिका विश्वकर्मा, सानिका मोरे, प्रेरणा पाटील होत्या. संघ व्यवस्थापक म्हणून तेजस्वी म्हात्रे व सोनाली पाटील यांनी काम पाहिले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे कॉलेजचे संस्थापक किशोर जैन, सीईओ कार्तिक जैन, प्रिन्सिपल, अॅडमिन्सट्रेशन ऑफिस वैभव नांदगावकर, राहुल घरत, हेड चैतन्य भगत, कॉलेज स्पोर्ट कमिटी मेंबर्स यांनी अभिनंदन केले.
Check Also
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …