परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त
कामोठे येथील पार्किंग बॉईज गु्रपच्या वतीने नगरसेवक चषक 2022 क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्व. दि. बा. पाटील क्रीडांगणात खेळल्या जात असलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 16) झाले.
उद्घाटन समारंभास पनवेल महापलिकेच्या माजी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती कुसूम म्हात्रे, माजी नगरसेवक दिलीप पाटील, विजय चिपळेकर, भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, रवींद्र म्हात्रे, अनिल चव्हाण यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, खेळाडू आणि क्रिकेटप्रेमी उपस्थित होते. या वेळी परेश ठाकूर यांनी मैदानात फटकेबाजी केली.
18 नोव्हेंबरपर्यंत रंगणार्या या स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्यास एक लाख, द्वितीय क्रमांकास 50 हजार, तर तृतीय क्रमांकास 25 हजार रुपये आणि सर्व विजेत्यांना चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे वैयक्तिक उल्लेखनीय कामगिरी बजावणार्या खेळाडूंनाही बक्षीस दिले जाणार आहे.