पनवेल : बातमीदार
शहरातील एका 56 वर्षीय इसमाकडून इन्शुरन्ससाठी घेतलेले पैसे इन्शुरन्स कंपनीत न भरता तब्बल 21 लाखांची फसवणूक केली आहे. शहर पोलिसांनी या प्रकरणी तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. रमेश नारायण गायकवाड हे महात्मा फुले रोड, पनवेल येथे राहत असून त्यांचा रिपेअरिंगचा व्यवसाय आहे. 2007 मध्ये दीपक शेळके व त्यांची र्ींर्ळींर ङळषश खर्पीीीरपलश उे-खपवळर ङींव.मध्ये एजंट असलेली पत्नी दीप्ती शेळके पॉलिसी उघडण्यासाठी आले होते. त्यानुसार त्यांनी सदर इन्शुरन्स पॉलिसी काढली. पॉलिसी काढल्यानंतर शेळके तीन महिन्याला 25 हजार रुपये घेऊन जात असत. त्यानंतर त्यांनी सतीश जाधव या व्यक्तीकडे पैसे देण्यास सांगितले. त्यानुसार त्याच्याकडे पैसे देण्यात आले. त्यानंतर 2008मध्ये दीपक शेळके, त्यांची पत्नी दीप्ती शेळके व सतीश जाधव हे तिघेही गायकवाड यांच्या घरी गेले व त्यांनी गायकवाड यांच्या नावावर र्ींर्ळींर ङळषश खर्पीीीरपलश उे-खपवळर ङींव. या कंपनीची 10 वर्षांची पॉलिसी काढली. त्यासाठी प्रत्येक तीन महिन्याला 50 हजार रुपये हप्ता ठरलेला होता. पॉलिसीची मुदत पूर्ण झाल्यानंतर 2018मध्ये त्यांना 37 लाख रुपये मिळणार होते. असे दोन्ही पॉलिसीचे मिळून गायकवाड यांनी 22 लाख रुपये भरले होते. काही काळानंतर गायकवाड यांना सदनिका घ्यायची असल्याने पैशांची गरज होती. त्यासाठी त्यांनी दोन्ही पॉलिसी मुदतीअगोदरच काढून घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी याबाबत सतीश जाधव यांना पॉलिसीचे पैसे कधी मिळणार याबाबत विचारणा केली असता त्यावर त्यांनी सांगितले की, डीडी मिळाला आहे. तो बँकेत भरला आहे. थोड्याच दिवसांत तुम्हाला तुमचे पैसे मिळतील. त्यानंतर काही दिवसांनी पैशांचे काय झाले याबाबत गायकवाड यांनी पुन्हा विचारल्यावर सतीश जाधव याने बँक डबघाईला आली तसेच बँक बुडाली. संचालकांना अटक झाली आहे, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्याने दोन चेक दिले, मात्र ते चेक बँकेत वटले नाहीत. त्यामुळे गायकवाड यांचा मुलगा सिद्धार्थ हा वाशी शाखेत गेला असता त्यांनी पॉलिसीचे स्टेटमेंट काढले. त्यानंतर त्यांना समजले की, शेळके पती-पत्नी व सतीश जाधव यांनी गायकवाड यांच्या नावावर असलेल्या पॉलिसीचा केवळ सुरुवातीचा म्हणजेच जानेवारी 2008चा पहिलाच हप्ता भरला आहे. बाकी दर तीन महिन्यांनी जे पैसे घेऊन जायचे ते त्यांनी भरलेलेच नव्हते. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे गायकवाड यांच्या लक्षात आले. दीपक शेळके, दीप्ती शेळके व सतीश जाधव यांनी गायकवाड यांच्याकडून 22 लाख रुपये घेतले व त्यातील 21 लाख रुपये इन्शुरन्स कंपनीत न भरता स्वतःच्या फायद्याकरिता त्याचा वापर करून अपहार केला आहे.