Breaking News

गुंडाच्या मालमत्तेवर हातोडा

विकी देशमुखच्या घराभोवतीचे बांधकाम पाडले

पनवेल : रामप्रहर वृत्त

योगी आदीत्यनाथ पॅटर्न राबवून नवी मुंबई पोलिसांनी तसेच सिडकोने कुख्यात गुंड विकी देशमुख यांच्या घराभोवती असणारे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले आहे. खून, बलात्कार, खंडणी, अपहरण यांसारख्या गंभीर गुन्हे करुन विकी देशमुख यांचे पनवेल, उरण आणि नवी मुंबई परिसरामध्ये दहशत माजवली होती. त्याची वाढती गुन्हेगारी रोखन्यासाठी पोलिसांनी कारवाई करुन त्याला व त्याच्या साथीदारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या तसेच त्याने ज्यांना ज्यांना धमकी देऊन खंडणीची मागणी केली अश्यांनी पोलीस तक्रार करण्याचे पोलिसांनी आवाहन केले होते. जेणे करून त्यांचे सुटकेचे सर्व मार्ग बंद व्हावे अश्यातच नवी मुंबई पोलीस आणि सिडकोने संयुक्तिक कारवाई करत विकी देशमुख याच्या गव्हाण येथील राहत्या घराभोवती असणारी अनधिकृत संरक्षण भिंत बुजडोजरच्या सहाय्याने गुरुवारी (दि. 17) सकाळी पाडली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश प्रमाणे गुन्हेगारांविरोधात बुलडोजर कारवाई करण्यास सुरुवात केली असल्याचे पहायला मिळत आहे.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply