Breaking News

भाजपच्या पाठपुराव्याने तळोजा सबवेची दुरुस्ती

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्षाने केलेल्या पाठपुरावामुळ तळोजा येथील भुयारी मार्गात होणारी पाणी गळती थांबविण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात येणार आहे. तळोजा (पाचनंदनगर) वसाहतीचे प्रवेशद्वार भुयारी मार्गात पाणी साचण्याची समस्या वाहनचालकांना डोकेदुखी ठरत आहे. यापार्श्वभूमीवर भाजपचे खारघर तळोजा मंडळ उपाध्यक्ष निर्दोश केणी यांनी मध्य रेल्वे प्रशासनाला निवेदन देऊन भुयारी मार्गाची उंची वाढवण्याची मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून रेल्वे प्रशासनाकडून तळोजा सबवेची दुरुस्ती करण्यात येणार आहे. यासाठी हा मार्ग दोन दिवस बंद राहणार आहे, अशी माहिती उपायुक्त काकडे यांनी काढलेल्या अधिसूचनेत जाहीर केली आहे. सिडको मंडळाने खाडी क्षेत्रावर भराव करून वसाहती वसविल्या आहेत. त्यामुळे समुद्र सपाटीपेक्षा खोल भुयारी मार्ग बांधल्यास त्यामध्ये पाणी साचण्याची भिती नेहमीच सर्वच सिडको वसाहतींना असते. तळोजा (पाचनंदनगर) वसाहतीचे प्रवेशद्वार भुयारी मार्गात काढल्याने तीनही ऋतूंमध्ये भुयारी मार्गात पाणी साचण्याची समस्या उद्भवते. वर्षभरापूर्वी याच भुयारी मार्गातील चिखलातून दुचाकी चालविताना झालेल्या अपघातामध्ये एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पावसाळ्यानंतर हिवाळ्यातही पाणी साचत असल्याने निर्दोश केणी रेल्वे प्रशासनाला पत्र व्यवहार केला. त्यानुसार तळोजा वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक महेश पाटील यांनी रेल्वे प्रशासनाला पत्र व्यवहार करून भुयारी मार्गात होणारी पाणी गळती थांबविण्याचे काम हाती घेण्याची सूचना केली. यानंतर रेल्वे प्रशासनाने हे काम शुक्रवारपासून हाती घेतल्याने हा भुयारी मार्ग चार दिवस वेगवेगळ्या मार्गिकांवर दुरुस्तीसाठी प्रवेश बंद ठेवण्यात येणार असल्याची अधिसूचना नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी जाहीर केली आहे. दुरुस्तीदरम्यान वाहनचालक पेंधर रेल्वे फाटकाच्या मार्गाने प्रवास करू शकतील, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

दोन दिवस मार्ग बंद राहणार

शुक्रवारी सकाळी 7 वाजल्यापासून ते शनिवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत तळोजा वसाहतीमध्ये जाणारा भुयारी मार्गावर वाहतूक बंद राहील तसेच शनिवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत वसाहतीमधून आरएएफ सिग्नलकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त काकडे यांनी काढलेल्या अधिसूचनेत जाहीर केलीये.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply