लोणावळा, पुणे : प्रतिनिधी
आयटीएमएस प्रणालीच्या कामासाठी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मंगळवारी पुन्हा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. पुण्याकडे येणार्या मार्गिकेवर दुपारी 12 ते 2 असा हा दोन तासांचा हा ब्लॉक असणार आहे. अमृतांजन पुलाच्या अलीकडे अन पलीकडे म्हणजे किलोमीटर 45 आणि 45.800 किलोमीटरवर ओव्हरहेड गॅन्ट्री बसवली जाणार असल्याने हा ब्लॉक घेतला जाणार आहे, अशी माहिती अधिकार्यांकडून देण्यात आली आहे.
या कामावेळी पुण्याकडे येणारी अवजड वाहतूक खालापूर टोल नाक्यावर थांबवली जाणार आहे. तसेच हलकी वाहतूक जुन्या मुंबई-पुणे महामार्गाकडे वळविण्यात येणार आहे. मात्र मुंबईकडे जाणारी वाहतूक मात्र सुरळीत सुरू असणार आहे. याची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. फक्त कार साठी जुना पुणे – मुंबई महामार्ग शिंग्रोबा घाटातील सुरू राहील.
मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर दरडी हटविण्यासाठी ब्लॉक घेण्यात आला होता. अनेकदा हा ब्लॉक घेण्यात आला होता. मात्र तब्बल महिना ते दीड महिन्यांच्या कालावधीनंतर उद्या ( मंगळवारी) पुन्हा 12 ते 2 असा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यात पुण्याकडे येणारी वाहतूक थांबवण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणार्या प्रवाशी नागरिकांनी यांची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Check Also
युवा वॉरियर्सच्या पदाधिकार्यांची नियुक्ती
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता युवा मोर्चा …