Breaking News

खारघरमधील हॉटेल निरसुख पॅलेसला आघाडी सरकारच्या काळात मद्यविक्री परवानगी

आमदार प्रशांत ठाकूर यांची माहिती; प्रयत्न हाणून पाडण्याचा निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त
खारघरमधील हॉटेल निरसुख पॅलेसला महाविकास आघाडी सरकारच्या काळात परवानगी मिळाल्याचे प्रथमदर्शी उघडकीस आले आहे, अशी माहिती भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी एका मुलाखतीत दिली. मद्यविक्रीला परवानगी देण्यात आल्याने खारघरवासीयांमध्ये तीव्र रोष आहे. खारघरला दारूमुक्त ठेवण्याचा दीर्घकाळ प्रयत्न सर्वांनी मिळून केलेला आणि म्हणून या अनुषंगाने मद्यविक्रीला बंदी घातली गेली पाहिजे यासाठीचा पाठपुरावा भारतीय जनता पक्ष करीत राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, राज्यात मधल्या कालावधीमध्ये ज्या वेळी महाविकास आघाडीची  सत्ता होती तेव्हा खारघरमधील हॉटेल निरसुख पॅलेसला मद्यविक्रीची परवानगी मिळाल्याचे समोर आले आहे. भारतीय जनता पक्षाच्या पुढाकाराने खारघरची दारूबंदी इतकी वर्षे कायम राहिलेली होती. येणार्‍या कालावधीतही अशा पद्धतीच्या या प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी भाजप सातत्याने पुढाकार घेईल.
आम्ही सर्व खारघरवासीयांना आश्वस्त करू इच्छितो की, खारघरला ‘बार घर’ बनवून न देणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि यामध्ये भाजप कुठेही मागे राहणार नाही. विविध स्वयंसेवी संस्था पुढे आल्यास निश्चितपणाने भाजप दारूबंदी अभियान उचलून धरायला तयार आहे, अशी ग्वाहीसुद्धा आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी दिली. त्यांच्यासमवेत भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply