Breaking News

नवी मुंबईत विनाकारण फिरणार्या 332 जणांवर कारवाई

आठवडाभरात 200 गुन्हे दाखल; 250 वाहने जप्त

पनवेल : बातमीदार – कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी अत्यावश्यक कारणाशिवाय नागरिकांना बाहेर पडण्यास व प्रवास करण्यास सक्त मनाई करण्यात आली असूनही अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर पडून स्वत:सह इतरांचा जीव धोक्यात घालत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करून अशा वाहनचालकांना पकडण्याची कारवाई सुरू केली.

त्यानुसार नवी मुंबई पोलिसांनी गेल्या आठवड्यात विनाकारण वाहन घेऊन फिरणाार्‍या नागरिकांविरोधात सुमारे 200 गुन्हे दाखल केले. एकूण 332 नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांची धरपकड केली. त्याचप्रमाणे 250 वाहने जप्त केली. कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असल्याने रुग्णसंख्येत वाढ होत आहे. करोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सामाजिक अंतर हा एकमेव उपाय असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लोकांनी आपापल्या घरात राहणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊनच अवघ्या देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. सरकारने यासंदर्भात लागू केलेल्या आदेशाचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून विविध ठिकाणी नाकाबंदी करून अत्यावश्यक सेवा वगळता अवैध प्रवासी वाहतूक व विनाकारण फिरणार्‍या वाहनधारकांची धरपकड सुरू आहे. तसेच त्यांची वाहने जप्त करण्याची कारवाई सुरू केली आहे.

नवी मुंबई पोलिसांनी मागील आठवडाभरात लॉकडाऊनदरम्यान विनाकारण वाहन घेऊन फिरणार्‍या व अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणार्‍यांविरोधात सुमारे 200 गुन्हे दाखल केले आहेत. तसेच एकूण 332 नागरिकांवर कारवाई करून त्यांची धरपकड केली आहे. त्याचप्रमाणे 250 वाहने जप्त केली आहेत. यातील परिमंडळ-1मध्ये 117 गुन्हे दाखल असून 140 जणांना ताब्यात घेण्यात आले. तसेच 70 वाहने जप्त करण्यात आली आहेत. परिमंडळ-2मध्ये 80 गुन्हे दाखल असून 192 नागरिकांना ताब्यात घेण्यात आले. 180 वाहने जप्त केली आहेत. नवी मुंबई पोलिसांकडून सुरू असलेल्या या कारवाईनंतर अनेक नागरिक वाहन घेऊन विनाकारण फिरत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

पनवेलमधून 52 वाहने ताब्यात

पनवेल : वार्ताहर – कोरोना विषाणूच्या प्रदूर्भावामुळे होम क्वारंटाईन असतानाही स्वतःसह इतरांची व समाजाची काळजी न घेता रस्त्यावर बिनधास्तपणे दुचाकी वाहने मौजमजेसाठी फिरणार्‍या 52 जणांविरूद्ध पनवेल शहर पोलिसांनी कारवाई करून सदर वाहने ताब्यात घेतली आहेत.

शासनाच्या आदेशानुसार, अत्यावश्यक कामे असतील तेव्हाच घराबाहेर पडावे, असे आवाहन असतानाही कामाशिवाय रस्त्यावर आपले दुचाकी वाहन काढून बिनधास्तपणे शहरभर फिरणे, मास्कचा वापर न करणे, बेदरकारपणे वाहन चालविणे, नियम मोडणे, कोणतीही कागदपत्रे जवळ न बाळगणे व फक्त मौजमजेसाठी पनवेल शहर परिसरात फिरणार्‍या व्यक्तींविरूद्ध पोलिसांनी सध्या कठोर भूमिका घेतली असून अशी वाहने थांबविण्यात येत आहेत व चौकशीमध्ये योग्य व समाधानकारक माहिती न दिल्यास त्यांची शहानिशा करून त्यांच्याविरूद्ध भादंवि 188 प्रमाणे कारवाई करून वाहने ताब्यात घेतली आहेत. आत्तापर्यंत जवळपास 52 दुचाकी वाहने पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply