पनवेल : रामप्रहर वृत्त
पक्षविरोधी कार्यवाही केल्यामुळे उरण तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष शेखर भास्कर पाटील यांची भारतीय जनता पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
शेखर पाटील हे युवा मोर्चाचे पदाधिकारी असतानाही त्यांनी पक्षाची जबाबदारी पार न पाडता सतत पक्षविरोधी कारवाई केली आहे. त्याचबरोबर पक्षाला कोणतीही सूचना न देता बोकडवीरा ग्रामपंचायतीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेकापसोबत परस्पर युती घालण्याचा घाट घातला. त्यामुळे विरोधी पक्षाला शेखर पाटील यांनी उघडपणे सहकार्य केल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षविरोधी कारवायांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचे काम त्यांनी करीत त्या विभागात पक्षाचे खच्चीकरण करण्याचे जाणूनबुजून काम केले. या संदर्भात वारंवार समज देऊनही शेखर पाटील यांच्या वर्तनात सुधारणा न झाल्याने भाजपचे उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर व युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांनी शेखर पाटील यांचे सहा वर्षांसाठी निलंबन करून पक्षातून हकालपट्टी केली आहे.
Check Also
कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा
विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …