पनवेल : रामप्रहर वृत्त
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड अलिबाग अंतर्गत मंगळवारी (दि. 22) झालेल्या पनवेल महानगरपालिका जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थीनींनी यश संपादन केले.
यामध्ये तन्वी रोहिदास चोरघे 12 वी प्रथम क्रमांक, अंजली राजेश सिंग 11 वी द्वितीय क्रमांक, तन्वी प्रकाश माधवी 12 वी तृतीय क्रमांक पटकावला. या सर्व विद्यार्थिनींची मुंबई विभगीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
त्याबद्दल संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, सहसचिव भाऊसाहेब थोरात, पर्यवेक्षक अजित सोनवणे, प्रशांत मोरे, क्रीडा शिक्षक अरुण पाटील, माधवी कोळी, मनोज पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Check Also
पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध
पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …