Breaking News

राज्य पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंचे यश

पनवेल : रामप्रहर वृत्त

कल्याण गोविली येथील जीवनदीप शिक्षण संस्थेने सब ज्युनिअर-ज्युनिअर (मुले-मुली) राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांमधून सुमारे 200 स्पर्धक सहभागी झाले होते. यात रायगडच्या खेळाडूंनी पाच रौप्य व तीन कांस्यपदके जिंकली. रायगड खेळाडूंच्या या यशाबाबत रायगड पॉवरलिफ्टिंग संघटनेचे गिरीष वेद, अरुण पाटकर, सचिन भालेराव, यशवंत मोकल, राहुल गजरमल आणि संघटनेचे मार्गदर्शक मारुती आडकर (शिव-छत्रपती पुरस्कारप्राप्त) यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Check Also

बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट

चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …

Leave a Reply