Saturday , December 3 2022

द्रोणागिरी उरण येथील एस. एस. पाटील शाळेचे क्रिडा क्षेत्रात सुयश

उरण : बातमीदार, प्रतिनिधी
एस. एस. पाटील इंटरनॅशनल स्कूल द्रोणागिरी उरण या शाळेतील विदयार्थ्यांनी क्रिडा क्षेत्रात पुन्हा एकदा नाविण्यपूर्ण कामगिरी बजावली आहे.
10वी यूनिफाइड जिल्हास्तरीय चॅम्पियनशीप स्पर्धा सातारा येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये एस. एस. पाटील शाळेच्या स्वयम पाटील इ. 2री सुवर्णपदक, स्मिथ नारंगीकर इ. 2री सुवर्णपदक, दिव्य मुंबईकर इ. 2री सुवर्णपदक, आदित्य घोडके इ. 6वी सुवर्णपदक, आरुष पाटील इ. 7वी सुवर्णपदक, रूद्र भोसले इ. 7वी सुवर्णपदक, अक्षरा घोडके इ. 6वी सुवर्णपदक, त्रिशिता भोईर इ. 8वी सुवर्णपदक या सर्व विद्यार्थ्यांनी विक्रमी यश प्राप्त केले आहे. या सर्व सुवर्णपदक विजेत्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका मृदूला धोडी यांचे मार्गदर्शन व शिक्षक सुरज टकले यांचेकडून प्रशिक्षण मिळाले आहे. सर्व विद्यार्थ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Check Also

राजिपकडून जनतेला मिळणार महत्त्वपूर्ण ऑनलाइन सुविधा

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषद (राजिप) प्रशासनाच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने नागरिकांना घरबसल्या कशा सुविधा …

Leave a Reply