Breaking News

राज्यस्तरीय लाठी स्पर्धेत रायगड संघाची सुवर्ण कामगिरी

रेवदंडा : प्रतिनिधी
तिसरी राज्यस्तरीय लाठी अजिंक्यपद क्रीडा स्पर्धा 19 ते 20 नोव्हेंबरदरम्यान तुळजापूर येथे झाली. यात रायगडमधून 36 खेळाडूंनी सहभाग घेत सुवर्ण कामगिरी केली आहे. या खेळाडूंनी 36 सुवर्णपदक, 12 रौप्यपदक व 16 कांस्यपदकांची कमाई केली. त्याचप्रमाणे स्पर्धेत पदकांच्या यादीमध्ये राज्यात रायगड संघाने द्वितीय क्रमांकाचे चषक पटकावले आणि रायगडकरांचे नाव उंचावले.
या स्पर्धेत मुलांमध्ये शिवम गुंजाळ याने एक सुवर्ण व एक कांस्यपदक, मंथन कदम एक कांस्यपदक, प्रियेश मसाल एक सुवर्ण, एक रौप्य, एक कांस्यपदक, भावार्थ पाटील एक रौप्यपदक, आराध्य शेळके दोन सुवर्णपदक, मिहिर शेळके एक सुवर्णपदक, तेज शेळके एक कांस्यपदक, वेद कदम दोन कांस्यपदक, मल्हार गुंजाळ दोन सुवर्णपदक, वेदास्तु गुरव दोन रौप्यपदक, देवदत्त पडवळ दोन सुवर्ण पदक, अर्णव तिवरेकर एक रौप्यपदक, हार्दिक अकोलकर एक रौप्यपदक, हित म्हात्रे एक सुवर्णपदक, हर्ष पाटील एक रौप्य, एक कांस्यपदक, सुजल झावरे एक सुवर्णपदक, एक कांस्य, रुद्र झावरे एक कांस्य, स्वरुप पाटील एक सुवर्ण, एक कांस्य पदक, दीप झावरे एक कांस्यपदक, श्रवण शेळके एक सुवर्ण, एक कांस्यपदक, मनस्व शेळके एक रौप्यपदक, सिद्धार्थ पाटील दोन सुवर्ण, एक रौप्यपदक, शिव हिलम दोन सुवर्ण, एक रौप्यपदक, रुद्राक्ष खारकर एक सुवर्ण, एक रौप्यपदक, निशांक शेळके दोन सुवर्णपदक पटकावले.
त्याचप्रमाणे मुलींमध्ये ओवी शेळके तीन सुवर्णपदक, आराध्या वर्तक एक सुवर्ण, एक कांस्य, आराध्य पंडीत नखाते एक सुवर्ण, एक कांस्यपदक, स्नेहा प्रचित मसाल दोन सुवर्ण, एक कांस्यपदक, तमना पाटील दोन सुवर्ण, एक कांस्यपदक, सृष्टी म्हामूणकर एक सुवर्ण, एक कांस्यपदक, साना तुळपुळे दोन सुवर्ण, एक रौप्यपदक, स्मृती म्हात्रे एक सुवर्ण, दोन कांस्यपदक, रेवा पाटील एक सुवर्ण, एक कांस्यपदक, लावण्या भगत दोन सुवर्णपदक, नम्रता चव्हाण एक सुवर्ण, एक कांस्यपदक पटकावले.
सर्व खेळाडूंनी एकम लाठी, दुय्यम लाठी, द्वै अनिखा, काटपवित्रा आणि पंचम लाठी या प्रकारात ही सर्व पदके कमावली आहेत. सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची निवड राष्ट्रीय स्पर्धेकरीता झाली आहे. या सर्व खेळाडूंना आंतराष्ट्रीय पंच प्रियंका गुजांळ, राष्ट्रीय पंच शुभम महेंद्र नखाते, वेदांत सुर्वे व रुपेश शेळके यांचे प्रशिक्षण लाभले आहे, तसेच लाठी असोशिएशन रायगड अलिबाग रायगडचे अध्यश प्रमोद मसाल यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply