रोहा : प्रतिनिधी
रायगड जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा नुकतीच खोपोली येथे झाली. या स्पर्धेत रोहा तालुक्यातील साने गुरुजी विद्यानिकेतन सानेगाव यशवंतखार या माध्यमिक विद्यालयातील अनुराग योगेश ठाकूर याने 14 वर्षांखालील 35 किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक पटकाविला.
अनुराग ठाकूर हा आठवी इयत्तामध्ये शिकत असून त्याला लहानपणापासूनच कुस्तीची आवड आहे. जिल्ह्यात विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन त्याने यश संपादन केले आहे. अनुरागने नुकतेच जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविल्याने त्याचे साने गुरुजी विद्यानिकेतन सानेगाव यशवंतखारचे अध्यक्ष नंदकुमार म्हात्रे, धर्मा ठाकूर, नथुराम ठाकूर, पांडुरंग भोईर, हेमंत ठाकूर, नामदेव मढवी, विठोबा गुंड, संतोष भोईर, किरण ठाकूर, मनोज ठाकूर, रवींद्र ठाकूर, शाळेचे मुख्याध्यापक गोरीवले, शिंदे, दिनेश भोईर आदींनी अभिनंदन केले.
Check Also
रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव
आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …