उरण : बातमीदार
रायगड जिल्हा क्रीडाधिकारी यांच्या वतीने शालेय बुद्धिबळ निवड स्पर्धा अलिबाग क्रीडा संकुल येथे घेण्यात आली. या स्पर्धेत उरण तालुका चेस असोसिएशनच्या खेळाडूंनी यश संपादन केले आहे.
उरण तालुका चेस असोसिएशनची खेळाडू बिशानी पाटील (रोटरी स्कूल) 14 वर्षाखालील गटात जिल्ह्यात तिसरी आली. 19 वर्षांखालील मुलींच्या गटात सारा प्रशांत पाटील द्वितीय, दिव्या पाटील तृतीय (सेंटमेरी हायस्कूल) आणि तन्वी सुनील कुंभार (यूईएस स्कूल) पाचवी आली.
बुद्धिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्याने या सर्व विद्यार्थिनींची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांना उरण तालुका चेस असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. यशाबद्दल या विद्यार्थिनींचे अभिनंदन होत आहे.
Check Also
वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …
RamPrahar – The Panvel Daily Paper