पनवेल : रामप्रहर वृत्त
राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत व रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयद्वारा झालेल्या पनवेल महानगरपालिका जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत चांगू काना ठाकूर (सीकेटी) ज्युनिअर कॉलेजच्या मुलींच्या 19 वर्षांखालील कबड्डी संघाने अटीतटीच्या सामन्यात उपविजेतेपद पटकाविले.
उपविजेत्या कबड्डी संघास शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त सुर्यकांत ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, सहसचिव भाऊसाहेब थोरात, पर्यवेक्षक अजित सोनवणे, प्रशांत मोरे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी खेळाडू व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Check Also
पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper