Breaking News

मुरूडमध्ये पाच ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी 116 अर्ज तर सरपंच पदाकरीता 25 उमेदवारी

मुरुड ः प्रतिनिधी
मुरूड तालुक्यातील काकळघर, वावडुंगी, वेळास्ते, तेलवडे, कोर्लई या पाच ग्रामपंचायतींसाठी सदस्यपदाकरीता 116 तर सरपंचपदाकरीता 25 अर्ज दाखल करण्यात आले.
शेवटच्या दिवशी शुक्रवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत वाढविण्यात आली होती. त्याबरोबर ऑफलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुभा प्रशासनाने दिली होती. त्यामुळे उमेदवारांना फायदा झाला. गर्दी वाढेल त्यामुळे तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी रोहन शिंदे व नायब तहसीलदार अमित पुरी यांच्याकडून दक्षता घेण्यात आली होती.
वावडुंगी ग्रामपंचायतीकरिता सदस्यपदासाठी सात तर सरपंचपदाकरीता दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.काकळघर ग्रामपंचायतीमधून सदस्यपदाकरिता 33 तर सरपंचपदाकरीता पाच अर्ज दाखल करण्यात आले.
वेळास्ते ग्रामपंचायत सदस्यपदाकरीता 11 तर सरपंचपदाकरीता तीन अर्ज दाखल करण्यात आले. तेलवडे ग्रामपंचायतीमधून सदस्यपदाकरीता चार उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. कोर्लई ग्रामपंचायतीमधून सदस्यपदाकरीता 30 तर सरपंचपदाकरीता पाच अर्ज दाखल करण्यात आले. एकूण 5 ग्रामपंचायतींमधील सदस्यपदासाठी 116 तर सरपंचपदाकरीता 25 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

Check Also

वैयक्तिक भूमिका बाजूला ठेऊन महायुतीच्या विजयाचा विचार करा- आमदार प्रशांत ठाकूर

अलिबाग (प्रतिनिधी): मोदींच्या नेतृत्वाखाली तटकरेंनी खासदार होणे ही सर्वांची गरज आहे. त्यामुळे सर्वांनी कामाला लागले …

Leave a Reply