भाजप नेते किरीट सोमय्यांच्या पोलीस आयुक्तांना सूचना
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
नवी मुंबईतील अनेक गुंतवणूकदारांनी 14 महिन्यांत दुप्पट पैशाच्या मोहापायी सानपाडा येथील दैविक उदय ट्रेड सेंटर या कंपनीत गुंतवणूक केली, मात्र त्यात गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्या प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर गुंतवणूकदारांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांची भेट मदतीची मागणी केली आहे.
शेअर बाजारात आणि क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करून महिन्याला साडेसात टक्के नफा आणि साडेसात टक्के व्याज असे एकूण 15 टक्के दर महिन्याला देण्याचे आश्वासन देत शेकडो गुंतवणूकदारांची लाखो रुपयांना फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भात गुंतवणूकदारांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांची भेट घेत मदतीची मागणी केली होती. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी नवी मुंबई पोलीस मुख्यालयात पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह यांची भेट घेऊन फसवणूक करणार्या गुन्हेगारांविरुद्ध तसेच कंपनी विरुद्ध त्वरित कारवाई करावी, अशा सूचना केल्या आहे.
पोलीस आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या यांनी
व्यक्त केलेय.