Breaking News

ऑनलाइन जुगावर कारवाई

पनवेल : स्किल ऑनलाइन गेम हा जुगावर खेळणार्‍या आठ जणांविरुद्ध तालुका पोलिसांनी कारवाई करून त्यांच्याकडून रोख रक्कम, स्कॅनर, स्क्रिन संगणक, सीपीयु, किबोर्ड असा मिळून जवळपास 31 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. जुने पनवेल-पुणे हायवे रोडवरील कोन गाव परिसरात एका गाळ्यामध्ये बेकायदेशीररित्या संगणकाद्वारे ऑनलाइन जुगार चालविला जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलचे वरिष्ठ निरीक्षक गिरीधर गोरे, सहाय्यक निरीक्षक विवेक भोईर, प्रवीण फडतरे, उपनिरीक्षक आकाश पवार व पथकाने छापा टाकून आठ जणांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडून 31 हजार 100 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केले.

Check Also

पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा

मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …

Leave a Reply