नागोठणे : प्रतिनिधी
येथील रिलायन्स कंपनीसमोर 27 नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या आंदोलनात सहभाग घेतलेल्या प्रकल्पग्रस्त तरुणाचा सोमवारी (दि. 21) अकाली मृत्यू झाला. त्यामुळे आंदोलनस्थळी हळहळ व्यक्त केली जात आहे.
जगदिश किसन वारगुडे (वय 29) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव असून, तो पिगोंडे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सारिका वारगुडे यांचा पुत्र होता. आंदोलनात सहभागी झालेल्या जगदिशची तब्येत ठीक नव्हती. घरी चक्कर आल्याने जगदिशला नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले असता डॉक्टरांनी तपासणी करून तो मृत असल्याचे घोषित केले. मृतदेह रोहे ग्रामीण रुग्णालयात नेण्यात येऊन तेथे शवविच्छेदन केल्यानंतर सायंकाळी उशिरा त्याच्या वेलशेत या गावी नेण्यात आला.
या घटनेची नागोठणे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे.
Check Also
कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …