Breaking News

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयात विज्ञान प्रदर्शन

चेअरमन परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या उलवे येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई विद्यालयात विज्ञान व कला प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्याचे उद्घाटन विद्यालयाचे चेअरमन तथा पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. दरम्यान, या प्रदर्शनाला रयतचे मॅनेजिंग कौंन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या वेळी मराठी माध्यमाचे चेअरमन शरद खारकर, स्कूल कमिटी सदस्य कविता खारकर, निलेश खारकर, मुध्याध्यापिका मुक्ता खटावकर आदी उपस्थित होते.
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई विद्यालयातील पूर्व प्राथमिक विभागाने लाईफ लाइन ऑफ सिटी या विषयावर आधारित उपक्रम सादर केले तसेच प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयाबरोबरच इतरही सर्व शालेय शैक्षणिक विषयांवर आधारित नावीन्यपूर्ण उपक्रम सादर करून आपल्या कलागुणांची चुणूक दाखवली.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply