खारघर : रामप्रहर वृत्त
धावपटू आणि क्रीडारसिकांसाठी पर्वणी तसेच नवी मुंबईतील सर्वांत मोठी असलेली खारघर मॅरेथॉन जानेवारी 2023मध्ये होणार आहे. त्या अनुषंगाने स्पर्धेच्या पूर्वतयारी व नियोजनसंदर्भात शुक्रवारी (दि. 9) खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
या बैठकीस स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे व्यवस्थापकीय संचालक तथा खारघर मॅरेथॉन स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, माजी नगरसेवक हरेश केणी, नितीन पाटील, अभिमन्यू पाटील, शत्रुघ्न काकडे, निलेश बाविस्कर, पापा पटेल, माजी नगरसेविका अनिता पाटील, आरती नवघरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी ही मॅरेथॉन यशस्वी व्हावी याकरिता मार्गदर्शन केले.
Check Also
पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …
RamPrahar – The Panvel Daily Paper