मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नऊ प्रचार सभा घेणार आहेत, अशी माहिती केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी शुक्रवारी (दि. 11) प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. पंतप्रधान मोदींची राज्यातील पहिली प्रचार सभा 13 ऑक्टोबर रोजी जळगाव येथे व त्याच दिवशी साकोली (जि. भंडारा) येथे सभा होईल. 16 ऑक्टोबरला अकोला, खारघर (पनवेल) व परतूर येथे आणि 17 तारखेला पुणे, सातारा, परळीत सभा होणार आहेत, तर 18 रोजी मुंबईत पंतप्रधानांची सभा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला भाजप राष्ट्रीय माध्यम विभाग सहप्रमुख संजय मयुख, प्रदेश मुख्यालय प्रभारी प्रताप आशर, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष माधवी नाईक, प्रदेश सह मुख्य प्रवक्ते व माध्यम विभाग प्रमुख केशव उपाध्ये, प्रवक्ते गणेश हाके उपस्थित होते.
Check Also
कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ
भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …