Breaking News

महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

पनवेल : रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व समन्वय समिती सदस्य अरुणशेठ भगत व स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य अनंताशेठ ठाकूर यांच्या हस्ते दोन्ही महान देशभक्त नेत्यांना प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाचे मुख्य अतिथी अरुणशेठ भगत यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनातील साधेपणाचे काही प्रसंग सांगून त्यांच्या महान व त्यागी नेतृत्वाचा गौरव केला. या वेळी विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे, ‘रयत’चे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य प्रमोद कोळी, लाइफ वर्कर व समन्वय समिती सदस्य रवींद्र भोईर, विद्यालयाचे उपप्राचार्य जगन्नाथराव जाधव, पर्यवेक्षक दीपक भर्णुके या मान्यवरांसह प्रा. राजेंद्र चौधरी, सागर रंधवे, जनार्दन खैरे व अरुण कोळी आदी उपस्थित होते.

उरण : वार्ताहर

रयत शिक्षण संस्थेचे उरण तालुक्यातील जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादुर शास्त्री या महापुरुषांची जयंती साजरी करण्यात आला. या वेळी जगाला सत्य, अहिंसा आणि सहिष्णूता यांची शिकवण देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि जय जवान-जय किसान घोषणेचे प्रणेते माजी पंतप्रधान भारतरत्न लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

या जयंती सोहळ्यास शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष व भारतीय मजदुर संघाचे राष्ट्रीय महामंत्री सुरेश पाटील, जासई गाव विकास आघाडीचे अध्यक्ष यशवंत घरत, नरेश घरत, व्हॉईस चेअरमन रामभाऊ घरत, अमृत ठाकूर, लॉरी चालक मालक संघाचे अध्यक्ष सुनील घरत, ग्रामपंचायत सदस्य अरुणा घरत आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

हा जयंती सोहळा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये विद्यालयाचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे लाईफवर्कर अरुण घाग,आणि प्रा. सुहास शिंदे, डी. बी. म्हात्रे, एस. पी. ठाकरे, डी. के. पाटील, एस. एम. ठाकूर आणि रयत सेवकांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रयत सेवक संघाचे उपाध्यक्ष नूरा शेख यांनी केले.

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयात शनिवारी (दि. 2)  राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तसेच महात्मा गांधी उद्यानातील राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या वेळी उपायुक्त गणेश शेटे, सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे, सहाय्यक आयुक्त डॉ. वैभव विधाते, सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे, कार्यकारी अभियंता संजय कटेकर तसेच महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply