Breaking News

कर्जतमध्ये एक्स्प्रेस गाड्यांना पूर्ववत थांबा द्यावा,

भाजपचे सुनील गोगटे यांचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांना साकडे
कर्जत : प्रतिनिधी
कर्जत रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्या थांबत नसल्याने तालुक्यातील तसेच आजूबाजूच्या तालुक्यातील प्रवाशांची तसेच विद्यार्थी, चाकरमान्यांची गैरसोय होते. भाजप किसान मोर्चाचे कोंकण समन्वयक सुनील गोगटे यांनी केंद्रीय राज्य मंत्र्यांची भेट घेऊन कर्जत रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा द्यावा, असे साकडे घातले.
कर्जत रेल्वे स्थानकावर कोरोनापूर्वी अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या थांबत होत्या मात्र सुरक्षेच्या कारणास्तव त्यातील बहुसंख्य गाड्यांचे थांबे रद्द करण्यात आले होते. आता सारे काही सुरळीत झाले आहे, मात्र पूर्वी होते त्या गाड्यांचे थांबे अद्याप सुरू झाले नसल्याने कर्जत तालुक्यातील तसेच आजूबाजूच्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे कर्जतमधील रेडिसन ब्लुमध्ये खाजगी कार्यक्रमासाठी आले असता भाजप किसान मोर्चाचे कोंकण समन्वयक सुनील गोगटे यांनी मारुती जगताप, हरिश्चंद्र मांडे, सर्वेश गोगटे यांच्यासह त्यांची भेट घेऊन लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचे थांबे पूर्ववत करण्याची विनंती केली. तसेच रेल्वे विषयक अन्य विषयांवरही चर्चा केली. रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी, ’कर्जत मधील तसेच अन्य भागातील रेल्वे विषयक प्रश्न घेऊन आपण दिल्लीला या, तेथे चर्चा करून ते प्रश्न सोडविण्याचा निश्चित प्रयत्न करू.
असा शब्द दिला. आम्ही लवकरच दिल्लीला जाऊन रावसाहेब दानवे यांची भेट घेणार आहोत, असे सुनील गोगटे यांनी सांगितले.

 

Check Also

आमदार महेश बालदी यांचा विविध वाड्यांमध्ये प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा प्रचार सभा प्रमुख प्रवीण काळबागे, माजी जि.प.सदस्य ज्ञानेश्वर घरत …

Leave a Reply